पूर्व नियोजित "रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन आता येत्या २६ आणि २७ ऑगस्ट रोजी

 

Rakhi Exhibition By Green Apple Exhibition

तसदीबद्दल क्षमस्व

प्रशासनाने १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता बंद ठेवल्याने पूर्व नियोजित "रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन आता येत्या २६ आणि २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. 

पुणे: रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. याच रक्षाबंधनाचे औचित्य साधत तसेच बाणेर बालेवाडी परिसरातील लोकांच्या दैनंदिन गरज लक्षात घेऊन 'रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल' चे आयोजन करण्यात आले आहे. 


शॉपिंग फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत लहू बालवाडकर सोशल वेल्फेअर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचेही काम लहू बालवाडकर सोशल वेल्फेअर करत आहे. आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचा या मागचा हेतू आहे.


लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या सहयोगाने बाणेर येथे  "रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. हा रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिव्हल १२ आणि १३ ऑगस्ट रोजी बाणेर येथील, कुंदन गार्डन मंगलकार्यालयात, सर्वांसाठी खुला राहणार आहे. बाणेर-बालेवाडीकारणांसाठी मनसोक्त खरेदी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील. 


इथे तुम्हाला पाहायला मिळणार विविध प्रकारचे राख्यांचे स्टॉल, बहिणीला देण्यासाठी रक्षाबंधन गिफ्ट, त्यामध्ये कांजीवरम, पैठणी, फाब्रिक डिझाईनर साड्या, हॅन्डलूम साड्या, पंजाबी सूट्स, कुर्तीज, प्लाझो, वेस्ट्रैन वेअर, रेडी टू वेअर ब्लाऊज, शोभेच्या वस्तू, अगरबत्ती, तोरण, किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, पेंटिंग, ब्युटी प्रॉडक्ट्स, शोभेच्या वस्तू, ऍरोमॅटिक कॅण्डल्स, हर्बल आणि ऑरगॅनिक प्रॉडक्ट, पेस्ट कंट्रोल, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचे  स्टॉल उपलब्ध असणार आहेत. तरी आपल्या परिवारासह या "रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल" ला भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.