पुणे: ‘दिवाळी’ हा शब्द उच्चारला, तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो, मन हर्षोल्हासित होते. नवी खरेदी, फराळाचे नानाविध पदार्थ, रांगोळी-रोषणाई, भेटवस्तू आणि आनंदीआनंद अशा वातावरणाची आस आपल्याला लागते. घरातील साफसफाईची लगबग सुरू होते, ‘दिवाळी पहाटे’च्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची मनोमन तयारीही होते. सध्याच्या डिजिटल युगात पारंपरिक दिवाळीलाही आधुनिकतेचे परिमाण लाभले आहे. दिवाळीचे औचित्य साधत ग्रीन अँपल एक्सहिबिशन आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने बालेवाडी येथे दोन दिवसीय दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.
बाणेर बालेवाडीकरांच्या दिवाळीतील गरज लक्षात घेऊन लहू बालवडकर सोशल वेलफेअर च्या माध्यमातून बालवाडीत ४ आणि ५ नोव्हेम्बर दरम्यान "दिवाळी शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हा दिवाळी फेस्टिव्हल बालवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर सकाळी ११.०० ते रात्री ९.३० पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली दोन दिवस मिळणार आहे.
या "दिवाळी शॉपिंग फेस्टिवल" मध्ये प्रामुख्याने दिवाळी लागणारे सजावटीच्या वस्तू, दिवाळी फराळ, आकाश कंदील, सुगंधित उटने, बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बाणेर-बालेवाडी परिसरातून चालना मिळेल.
उद्योजकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी
हिंजवडी आय. टी. पार्क जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडीकारणांसाठी खास "समर शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी बाणेर-बालेवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. तसेच या पुढेही ऑनलाईन सेवा देऊ शकता तरी या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा.