पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण; खानापूर पुन्हा हादरले

पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण; खानापूर पुन्हा हादरले
विशाल भालेराव
खानापूर मधील एका नामांकित पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खानापूर मध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.खानापूर मधील 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून इतर 17 जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांच्याकडून देण्यात आली .सदर व्यक्तीवर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

         खानापूर मध्ये रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच गावातील व्यावसायिकांनी दुकाने बंद करून घेतली.सदर व्यक्तीला कोरोनाची लागण नेमकी कशी व कोणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावातील इतर दोन व्यक्तींना ताप,खोकला अशी लक्षणे जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खानापूरमधील रुग्ण संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

      खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून 'आशा' सेविकांनी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केलेली असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणीही करण्यात येत असल्याचे सरपंच निलेश जावळकर यांच्याकडून सांगण्यात आले. हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.