वुमेन्स क्लब खराडीच्या वतीने चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये मोफत आरोग्य तपासणी

Free health check up at Wadgaon Sheri Police Station on behalf of Women's Club Kharadi

पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


  • सिंहगड टाईम्स: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वारीयर्स ठरलेले पोलीस कर्मचारी ही कोरोनाच्या संक्रमण छायेत आपले कर्तव्य बजावत आहे. त्या पोलिसांमुळे संसगार्चा धोका अधिक आहे. अशात खात्यातील एक अधिकाऱ्यांची कोरोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात ही भीती पसरली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी व मनोबल वाढविण्या कामी चंदन नगर स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची वुमेन्स क्लब खराडीच्या वतीने चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.


करोना पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याने त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे असे पोर्णिमा लुनावत यांनी सांगितले.

श्रीमती सीमा तंवर आणि पोर्णिमा लुनावत यांच्या नेतृत्वात वुमेन्स क्लब खराडी यांच्या  वतीने तसेच डॉ. राशी बाजपेयी आणि डॉ. सुभद्रा सिन्हा यांच्या सहकार्याने चंदन नगर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून देण्यात आली. करोनाच्या कठीण अश्या परिस्थितीत पोलिस कर्मचारी त्यांच्या दैनंदिन आरोग्यावर प्रचंड ताण असल्याने पोलीस कर्मचारी त्यांच्या लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, ही बाब लक्ष्यात घेऊन वुमेन्स क्लब खराडीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी पोलीस बांधवांचे रक्तदाब, वजन, तपमान, ऑक्सिजन पातळी इत्यादी पातळीवर संपूर्ण आरोग्य तपासले. यावेळी १५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली

या वेळी पोलीस निरीक्षक शंकर खटके यांच्या कडून वुमेन्स क्लब, सीमा तंवर,पौर्णिमा लुनावत, डॉ. राशी बाजपेयी आणि डॉ. सुभद्रा सिन्हा आदींचे आभार मानण्यात आले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.