राममंदिर सोहळा पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांना पोलिसांकडून नोटीस

Rammandir-ceremony-on-MLAs-Mahesh-landage-notice-from-Police
“हिंदुत्ववादी” आमदार महेश लांडगे यांना नोटीस; महाआरती, मिठाई वाटपास मनाई

रामजन्मभूमी अयोध्या येथे उद्या (दि.५ ऑगस्ट) श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल १० लाख मोतीचूर लाडुचे वाटप करण्यात येणार होते तसेच आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा असे नागरिकांना आवाहन देखील केले होते. मात्र या आनंददायी सोहळ्यात आता विघ्न आले आहे

आयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करीत पिंपरी- चिंचवडमध्ये लाडू वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करणारे भाजपाचे हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे, श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत उद्या (दि. ५ ऑगस्ट) होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांमध्ये पहिली नोटीस भोसरीचे आमदार आणि पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना बजावण्यात आली आहे.

तसेच या उपक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी भोसरीचे आमदार आणि पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांची असेल असे या नोटीशीमध्ये नमूद केले गेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.