वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने येरवड्यातील एस ओ एस चिल्ड्रन्स विलेज येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 

World-Mission-Society of God Church Organizes Drawing Competition at Children's Village, Yerwada

येरवडा: वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने येरवड्यातील एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेज येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा घेण्यात आली. तेथील मुलींना खाऊवाटप केले. त्यांना स्केचबुक आणि रंगीत पेन्सिल देण्यात आली.त्यांना "तुमचे स्वप्न " हा विषय देण्यात आला होता. 


कोविड -१९ मुळे कठीण परिस्थिती असली तरी आम्ही मुलांमध्ये स्वप्ने आणि आशा निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.  मुलांचे शरीर व मन निरोगी व तेजस्वी असते. जे मानवजातीला स्वतःची मुले मानतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात, त्या एलोहिम परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करून जगातील सर्व मुलांवरील मानसिक तणाव दूर करण्यासाठी वर्ल्ड मिशन सोसायटी ऑफ गॉड चर्चच्या वतीने प्रयत्न करण्यात आला. सर्वानीच अतिशय सुंदर चित्रे काढली होती. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मा. रेखाताई टिंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  च्या युवती अध्यक्षा अश्विनी परेराचंद्रकांत टिंगरे यांनीही स्वयंसेवकांमध्ये भाग घेतला. स्वयंसेवा करत असलेल्या NCP चे युवती अध्यक्षा अश्विनी परेरा यांनी स्केचबुक, रंगीत पेन्सिल आणि वृक्षारोपणला सक्रिय पाठिंबा देऊन या उपक्रमाचे स्वागत केले.


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेविका मा. रेखा टिंगरे यांनी प्रोत्साहन दिले आणि आमचे आभार मानून म्हणाले, “ अनाथ मुलासाठी घेतलेला हा उपक्रम वाखाणण्यासारखा असून. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. चर्च ऑफ गॉड समाजासाठी महान कार्य करत आहे. सहभागी झालेली सर्व मुले विजेते आहेत आणि त्यांनी चांगले रेखाचित्र आणि रंग काम केले आहे. म्हणत त्यांनी मुलांचे कौतुक केले. 


एसओएस चिल्ड्रेन व्हिलेजच्या अधिकारी स्वाती फडनिस म्हणाल्या की, “या अनाथाश्रमाच्या मुलांना प्रेरित करण्यासाठी चर्च ऑफ गॉडचे आभार. त्यांना खरोखर अशा प्रकारच्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे. या कार्यक्रमानंतर भविष्यासाठी त्यांचे ध्येय स्थिरावतील. कृपया पुन्हा या, कारण मुलांना अशा चांगल्या उपक्रमांची गरज आहे. आम्ही कोविडमुळे सर्व मुलांना कार्यक्रमासाठी बोलवू शकलो नाही.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.