महिला व बालकल्याण बालविकास प्रकल्पाअंतर्गत सदृढ बालक उपक्रम

बालविकास प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत सदृढ बालक उपक्रम
विशाल भालेराव
महिला व बालकल्याण सभापती पूजा नवनाथ पारगे यांच्या हस्ते सी. एस. आर च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालके कुपोषणमुक्त व्हावीत यासाठी बोर्नविटा, कॉर्नफ्लेक्स, टॅक पावडर फाइव स्टार चॉकलेट यांचे वाटप आज दिनांक १७  रोजी प्रतिनिधीक स्वरूपात तालुक्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. बोर्नविटा कॉर्नफ्लेक्स पावडर फाईव्ह स्टार चॉकलेट चे वाटप बालकांना ताबडतोब करण्यात यावी अशा सूचना बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सभापती पूजा पारगे यांनी दिल्या. लाॅकडाऊन कालावधी चालू असल्याने सदर चे वाटप करीत असतानाच अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांनी कुपोषित बालकांच्या आग्रह भेटी देऊन सदर बालके कुपोषणमुक्त कसे होतील याबाबत प्रयत्न करण्यास सांगितले त्याप्रमाणे पालकांशी संवाद साधून बालकांना खेळाबरोबर शिक्षणाची गोडी कशी लागेल याबाबत मार्गदर्शन करण्यास सभापती पूजा नवनाथ पारगे यांनी सांगितले. काही बालविकास प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी यांनी लोकडाऊन काळात स्वतःचे पैसे खर्च करून गरजूंना आर्थिक तसेच वस्तू स्वरुपात/ धान्याच्या स्वरूपात दान दिले. अशा अधिकाऱ्यांचा सत्कार सभापती व महिला व बालकल्याण सभापती समितीच्या सदस्यांनी केला. सदरचे वाटप प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर जिल्हा परिषद सदस्य भारती धुमाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे  व सर्व तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते .सदर कुपोषित बालकांना खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.

पुणे जिल्ह्यामध्ये एसएएम बालकांची संख्या 150 असून एसएएम बालकांना प्रतिबालक बोर्नव्हिटा १, कॉर्नफ्लेक्स पाकीट 2, टॅग पावडर पाकीट २, फाईव्ह स्टार चॉकलेट २ याप्रमाणे वाटप केले एमएएम बालकांची संख्या १,००० असून बालकांना प्रतिबंध कॉर्नफ्लेक्स पाकीट १ याप्रमाणे वाटप केले. ३ ते ६ वयोगटातील सर्व बालकांची संख्या १,०५,००० असून सदर सर्व बालकांना फाइव स्टार चॉकलेट चे वाटप करण्यात आले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.