पानशेत-घोल रस्ता मोजतोय शेवटची घटका

विशाल भालेराव
विशाल भालेराव 
सिंहगड टाईम्स-,दि.१७ :  गेली अनेक वर्षे पानशेत- घोल रसत्याचे डांबरीकरण न केल्याने मोठे खड्डे पडले असून रोड वरील खडी बाहेर पडुन दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर माती दगडं पसरली आहेत. पुर्णतः डांबर उडाल्याने रस्त्याचे आयुष्य संपले असून शेवटची घटका मोजत आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता तग धरून राहत नाही.पावसाच्या सरींचा मारा आणि रस्त्यावरून जोराने वाहणारे पाणी यामुळे रस्ता लवकर उखाडला जातो. असे असतानाही पानशेत-घोल रस्ता गेली अनेक वर्षापासून  नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. तात्पुरते उन्हाळ्यात खड्डे बुजावले जातात परंतू पावसाळा आला की पुन्हा एका पावसात जैसे थे परिस्थिती होत असते.सध्या परिस्थित हा रस्ता खड्डे बुजावण्याच्याही लायकीचा राहीला नाही.शेवटची घटका मोजत असलेला येथील रस्ता पुर्ण नुतणीकरण करून कारपीट टाकणे व ज्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी काँक्रेटीकरण होणे गरजेचे आहे.
निवडणूक आल्यावर राजकीय मंडळी येऊन जातात व लवकरात लवकर रस्त्यावर डाबंरीकरण करू आशी हवेतील आश्वासन देऊन आपली राजकीय पोळी भाजुन घेतात. ग्रामस्थांनी व सामाजिक संघटनांनी वेळोवेळी बाधकाम विभागाला पत्रव्यवहार केला असुन कोणीच दखल घेत नाही. दिलीप कडू, स्थानिक ग्रामस्थ

    अतिशय दुरावस्त झालेल्या रस्त्यावर वाहन चालवणे मोठं जिकिरीचे झाले आसून रस्त्यावर जिकडे तिकडे वर निघालेली खडी,माती मोठ मोठे खड्डे हेच पाहायला मिळत आहे. या परीसरातील आबेगाव, कांबीगी, कोशिमघर, भालवडी, चिखली, कशेडी, घोलखड ,गोडेंखल, दापसरे,घोल येथील नागरीकांना घोल हा रस्ता पुण्याला जोडणारा मुख्य रस्ता असून पानशेत हे  बाजार पेठेचे ठिकाण आहे. आबेगाव, कुरवटी, मोसे, साईव, येथील अनेक विद्यार्थी हे पानशेत येथे ये-जा करून शिक्षण घेत असतात.खराब रस्त्यामुळे विध्यार्थी सायकलचा वापर न करता बरेच किलोमीटर पायी चालणे पसंद करत आहेत.याचबरोबर घोल परिसरातील नागरीकांसाठी बँक, शासकीयदवाखाना, शासकीय कार्यालये, कृषी कार्यालय, रेशन दुकान, पशुवैद्यकीय दवाखाना हे पानशेत येथे असल्याने नेहमी रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते. या परिसरात उद्योग धंदे, नोकरीच्या कोणत्या सुविधा नसल्या कारणाने येथील तरूण वर्ग नोकरी किंवा उद्योग व्यवासायासाठी पुण्याला जावे लागत असते.रात्री अपरात्री या रस्त्यावरून प्रवास करणे जिवघेणे ठरू शकते.

पानशेत पासून २४ किलोमीटर घोल गांव आहे.एवढा किलोमीटरचा प्रवास हा खाचखळगे चुकवत करावा लागतो.आता पावसाळाही सुरू झाला आहे.रस्त्यांच्या बाजूला गटारे नसल्याने आजूबाजूच्या डोंगर दऱ्यातील पाणी रस्त्यावर येवून तलावाचे स्वरूप तयार होते. गरोदर महीला,जेष्ट नागरिक आजारी पडल्यावर आशा ठिकाणाहून प्रवास करणे मोठ्या जिकरची ठरत असल्याने नागरिकांना खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. पानशेत -घोल रस्ता शेवटची घटका मोजत असून त्याचे नुतणीकरण लवकरात लवकर करावे आशी मागणी येथील २४ गावातील ग्रामस्थ करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.