खडकवासला धारणालगत होणार तब्बल २८ एकरात भव्य पर्यटन केंद्र Amusement Park, जलसंपदा विभागाने काढली निवेदा

खडकवासला धारणालगत विकसित होणार भव्य पर्यटन केंद्र (Amusement Park)

त्रिंबकआण्णा मोकाशी आणि अनिता इंगळे यांच्या प्रयत्नांना यश

खडकवासला धरणालगत जलसंपदा विभागाच्या रिकाम्या जागेत पर्यटन केंद्र (AMUSEMENT PARK) होणार आहे. धारणा लागत असलेल्या जलसंपदा विभागाच्या पडीक जागेमध्ये हा प्रकल्प उभा राहणार असून येथील जागा बांधा, वापरा, हस्तांतरण करा तत्वावरील हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी अचानक खडकवासला धरणाला भेट दिली. या संदर्भात मागील महिनाभरापासून वरिष्ठ अधिकारी धरण परिसरात येऊन पाहणी करत आहेत. त्यानंतर पुढं पुढच्याच आठवड्यात जलसंपदा विभागाकडून या कामाची निवेदा काढण्यात आली आहे.
Sinhagad Times

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा मतदार संघ ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबकआण्णा मोकाशी आणि जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे हे एक ते दीड वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून तब्बल २८ एकरात हे भव्य पर्यटन केंद उभा राहत आहे.

 खडकवासला धारणा शेजारी हा उभा राहणार असून ही प्रस्तावित आराखड्यात मुख्य थीम मनोरंजन पार्क (AMUSEMENT PARK) असून यात उप-थीम समाविष्ट असू शकतात सूक्ष्म उद्यान, म्युझियम, गिफ्ट शॉप्स, प्लेनेटोरियम, बँक्वेट, रिसोर्ट आणि रेस्टॉरंट, बहुउद्देशीय हॉल इ. चा समावेश असणार आहे या पर्यटन केंद्राचा फायदा आजूबाजूच्या गावांना तसेच पुण्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना याचा फायदा होणार आहे तसेच महाराष्ट्राच्या महसुलातही भर पडणार आहे गेली दिड वर्षा पासुन आम्ही यांचा पाठपुरावा करत आहे. याला आज यश आल मी सुप्रिया सुळे आणि जंयत पाटील यांचं मनापासुन अभिनंदन करतो. असे त्रिंबकआण्णा मोकाशी आणि अनिता इंगळे यांनी सांगितले.

या संदर्भात गेल्या आठवड्यातच जलसंपदा मंत्री पाटील यांनी याबाबत अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली असून मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी भेटी देऊन जागेची पाहणी केली आहे. धरणाच्या भिंतीच्या पुढील बाजूस तसेच नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस ही रिकामी जागा आहे त्या ठिकाणी हे पर्यटन केंद उभारलं जाणार आहे. या रिकाम्या जागेचा विकास करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकराचा हेतू असणार आहे. यामधून शासनाला महसूल देखील उपलब्ध होणार आहे. अशी माहीती पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांनी दिली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.