श्री ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी पोलिस तपासात दिरंगाई; आमदार भीमराव तापकीर यांचा सभागृहात आवाज

Delay-in-police-investigation-in-Shree-Jewellers-fraud-case-MLA-Bhimrao-Tapkir-alleges-in-the-House

मुंबई: पुण्यातील धायरी परिसरात ‘श्री ज्वेलर्स’ या सराफ व्यावसायिकाकडून झालेल्या आर्थिक फसवणूकप्रकरणी पोलिस तपासातील दिरंगाई आणि दुर्लक्षावर आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात आवाज उठवला. आमदार तापकीर यांनी सभागृहात सांगितले की, "फसवणूक झालेल्या नागरिकांनी १ तारखेला तक्रार दाखल केली असताना पोलिसांना एफ.आय.आर. नोंदवण्यासाठी तब्बल ९ दिवस लागले. "या प्रकरणात नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून देखील पोलिसांनी तपासात गंभीरपणा दाखवलेला नाही," 


तापकीर म्हणाले, “श्री ज्वेलर्सने आकर्षक व्याजदर दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक स्वीकारली. परंतु नंतर दुकान बंद करून संबंधित पलायन झाले. आजही अनेक गुंतवणूकदार आपल्या बचतीच्या पैशांसाठी आणि दागिन्यांसाठी वणवण करत आहेत. पण पोलिसांची चौकशी संथ आहे आणि तपास अधिकाऱ्यांनी अपेक्षित गंभीरपणा दाखवलेला नाही.”


या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्व माहिती मागवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. 


श्री ज्वेलर्स फसवणुकीचे काय आहे प्रकरण

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, धायरीतील रायकर मळा भागातील श्री ज्वेलर्स या सराफ दुकानाने ‘सुवर्ण भिशी’च्या नावाखाली गोरगरीब नागरिकांची, विशेषतः महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल महिन्यात ही फसवणूक लपवण्यासाठी दुकान मालकाने खोटा दरोडा रचून पोलिस आणि ठेवीदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर गायब होऊन ठेवीदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सिंहगड रोड परिसरात परिसरात संतापाची लाट उसळली आहे.  सुवर्ण भिशीच्या नावाखाली लाखो रुपये जमा करून लोकांचा विश्वासघात करणारा दुकानदार विष्णू दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती दहिवाळ यांनी ३६ ठेवीदारांची फसवणूक करून सध्या फरार असून, या फसवणुकीमुळे अनेक गोरगरीब, कष्टकरी महिलांचे संसारच उध्वस्त झाले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.