नगरसेवक राजाभाऊ लायगुडे भागवत आहेत गरजू गोरगरिबांची भूक

Sinhagad Times
धायरी दि. 23 (सिंहगड टाईम्स) कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. देशातील सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हि पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांच्या कडून जेवण वाटप केले जात आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सापडलेले मजूर, हातावर पोट असलेले गोरगरीब तसेच गरजुना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून प्रशासनासहित सर्वच जण प्रयत्न करीत आहेत, पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३३ चे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे हे स्वतः आचारी बनून रोज गराजून साठी जेवण बनवत आहेत. धायरीमध्ये रोज पोटभर पुरेल एवढ्या जेवणाच्या पॅकेट्स चे वाटप त्यांच्या कडून केले जात असून दोन हजाराहून अधिक लोकांना किराणा माल तसेच कांदा, बटाटे भाजीपाला आदींचे वाटप केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे  यांच्या केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब, मजूर, कामगार यांना आवश्यकतेनुसार दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. याबाबत बोलताना राजाभाऊ यांनी सांगितले, की धायरी परिसरात लॉकडाऊन असल्याने अनेकजनांंच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून रोज हजार दीड हजार गरजूंना पोटभर पुरेल एवढे जववणाचे पॅकेट्स देत आहोत.



जाहिरात

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.