राज्याला सावरण्यासाठी शरद पवारांची धडपड अद्भुत, संजय राऊत

Sharad Pawar and Sanjay Raut
मुंबई : राज्यातील लॉकडॉउन हळूहळू कमी केला जात आहे पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत आता राष्ट्रवादी कॉंग्रसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अधिकच सक्रिय झाले आहेत. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केले आहे. आपत्कालीन कामाचा दांडगा अनुभव असल्याने कोरोना संकटाच्या काळात राज्याला सावरण्यासाठीची त्यांची धडपड अद्भुत असल्याचं राऊत यांनी ट्विटर वरून म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोरोना संकटाच्या परिस्थितीचा हॉटस्पॉटवर जाऊन आढावा घेताना दिसून आले. गेल्या ५० दिवसापासून घरी बसून लॉकडाऊनचं पालन करणारे व संपुर्ण देशाचा राज्याचा घरी बसून आढावा शरद पवार, शुक्रवारपासून कोरोनाच्या लढाईत घराबाहेर पडले आहे.

मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी शरद पवार यांनी जागेची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी क्वारंटाईन सुविधांची पाहणी केली. पवारांच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं म्हटलंय.

अश्यातच जळगावात ५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. चार जण मृत्यू पावले आहेत. ग्रामीण मध्ये अमळनेर वगळून स्थिती बरी आहे. तरी सुद्धा जळगावात संशयित रूग्णांचे लवकर तपासणी अहवाल यावेत याच्या सूचना मी देतो. असे म्हणत पवार यांनी आपण अपडेट असल्याचे दाखवून दिले. या आधीही शरद पवार घरी असतानाही सातत्याने संपुर्ण महाराष्ट्राशी फेसबुक लाईव्ह वर संपर्क साधून जनतेशी विचार विनिमय करत होते.

राज्यात शरद पवार यांचा दांडगा संपर्क आहे, तालुका गाव पातळी वर त्यांची विश्वासु कार्यकर्ते आहेत.  राज्यातील कोरोनाचा वाढत असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत आता राष्ट्रवादी कॉंग्रसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अधिकच सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी थेट जिल्हापातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पवार यांनी थेट जळगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले यांच्याशी संपर्क करुन संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.