धायरी परिसरात शिवसेना विभाग प्रमुख निलेश गिरमे यांच्याकडून गरजूंना मोफत जेवणाची सोय.

Nilesh Girme, Shivsena, Mahadikas Aaghadi
धायरी प्रतिनिधी
धायरी, दि.२० (Sinhagad Times)  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीपासून ते स्थानिक पातळीवर अनेक परिणाम झाल्याचे आढळून येत आहे. धायरी येथे कोरोना व्हायरस व लॉकडाऊनमुळे लोकांचे उपासमार होत आहे. सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हि बाब लक्षात ठेवून शिवसेना विभाग प्रमूख निलेश गिरमे हे गेल्या २५ दिवसापासून धायरी येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शिवथाळी मार्फत जेवण देत आहेत.

सिंहगड रोड अभिरुची मॉल जवळ निलेश गिरमे यांचे संकल्प प्रतिष्ठान व संपर्क कार्यालय आहे. गेल्या २५ दिवसापासून दररोज या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांसाठी मोफत शिव थाळीच्या माध्यमातून धायरीतील लोकांसाठी जेवणाची सोय करून दिली आहे. या जेवणामध्ये चपाती भाजी व मसाले भात यांचा समावेश असून सकस व पौष्टिक आहे, दर रोज ६०० ते ७०० नागरिक जेवणाचे पार्सल घेऊन जात आहेत, त्याच बरोबर ज्या कोणी माता भगिनी येत आहेत त्यांच्यासाठी भाजीपालाही मोफत दिला जात आहे.

"अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन धायरी परिसरात कोणीही उपाशी राहू नये म्हणून संकल्प प्रतिष्ठन च्या वतीने शिवथाळी गेल्या २५ दिवसापासून सुरू केली आहे, दररोज ६०० ते ७०० गरजू येथून जेवण पार्सल घेत आहेत, कठीण काळात त्यांच्यासाठी माझ्याकडून मदत होत आहे यात समाधान भेटत आहे". असे शिवसेना विभाग प्रमुख निलेश गिरमे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी जपत या करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून निलेश गिरमे यांच्या कडून धायरी परिसरात निर्जंतुकिकरण  औषध फवारणी असेल गरिबांना मोफत किराणा वाटप, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरजूंना शिव थाळी मार्फत मोफत जेवणाची सोय असे सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. या कार्यात मनोज चव्हाण, संजय गायकवाड, समीर बडदे, विजय कणसे, निलेश पोळ, प्रशांत जाधव, लोकेश राठोड आदींची मदत होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.