जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे आणि सभापती पुजा पारगे यांची बारामती कृषी विज्ञान केंद्रास यांची भेट

Puja-Parage-visit-the-Agricultural-Science-Center
विशाल भालेराव
सिंहगड - आज दि. २४ रोजी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची, कमी दिवसात प्रक्रीया करून विविध प्रकारचे फळझाडांना फळे कशी लागतील, माती परिक्षण, तसेच शेतक-यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण केंद्र, अशा विविध शेतक-यांना शेतीसाठी आवश्यक असणा-या बाबींची माहिती सदर संशोधन केंद्रामध्ये मिळाली. आजपर्यंत जवळजवळ ८ लाख शेतक-यांनी सदर केंद्रास भेट दिल्याचे समजले.

            सदर भेटीच्या वेळी माझ्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, समाज कल्याण सभापती सारीकाताई पानसरे, जि.प.चे माजी अध्यक्ष तथा जि. प. सदस्य विश्वासराव(नाना) देवकाते, जि. प.सदस्या मिनाक्षी तावरे, जि. प. सदस्या रोहिणी तावरे, जि. प. सदस्य भरत खैरे, पं. स. सभापती, उपसभापती, पं. स. सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.