सिंहगड व्यक्ती विशेष....आर.जी.यादव - समाजकारण ते राजकारण

सिंहगड व्यक्ती विशेष....आर.जी.यादव - समाजकारण ते राजकारण
त्यांच्या समाजकारणापासून राजकारणापर्यंतची यशोगाथा खास  वाचकांसाठी.

विशाल भालेराव
सिंहगड-यशस्वी व्यक्तीची कहाणी सर्वांनाच आकर्षित करते. यशोगाथा वाचून लोक यशाचा मूलमंत्र जाणून घेतात. जगभरात लोकांना प्रेरणादायी ठराव्या अशा अनेक यशोगाथा आहेत. रोज नवनवीन कहाण्या लिहिल्या जात आहेत. या प्रेरणादायी कहाण्या वाचून अनेकांमध्ये सकारात्मक परिवर्तन होत आहे, काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होत आहे. पण प्रत्येक प्रेरणादायी कहाणी लोकांच्या लक्षात राहतेच असे नाही. काही कहाण्या कालोघात लोप पावतात. तर काही कहाण्या वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या प्रभावशाली ठरतात. त्यांची लोकप्रियता कायम राहते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे आर. जी. यादव यांची. ही कहाणी कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे, बोधकथा ठरली आहे. त्यांची कहाणी वेगळी आहे, छाप पाडणारी आहे, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका गावातल्या पुरुषाची आहे. या कथेत अनेक चढउतार आहे, संघर्ष आहे, नैराश्य आहे, निरागसता आहे, अपयश दडलेले आहे मात्र या अपयशातच भलेमोठे यश दडलेले आहे.  या यशस्वी पुरूषांचा उद्यमीचा प्रवास थक्क करणारा आहे. एक गरीब कुटुंबातील व्यक्ती यशाची शिखरे पादाक्रांत करत पुण्यासारखा सारख्या मायानगरी मध्ये एक यशस्वी पोस्ट विभागात नाव कमावले. एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या आर.जी. यादव यांच्या घरात कोणताही  राजकीय वारसा नसताना राजकीय अनुभव त्यानी घेतला यांच्यात यश आले नाही. पुन्हा उभारी देत त्याच्या राजकारणात न पडता सामाजिक कार्य करण्याचा वसा त्यांनी घेतला. आर. जी. यादव यांनी आपल्या जीवनात जातीवाद, गरीबी, बाल-विवाह, लोकांकडून छळ, अपमान, निंदा, तिरस्कार, धमक्या, अपघात या साऱ्याचा अनुभव घेतला आहे. असह्य अशा परिस्थितीसमोर हात टेकत त्यांनी यशाच शिखर सर केल. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, इमानदारी, साहसी वृत्तीने मार्गक्रमण करत उतुंग उंची गाठणाऱ्या आर.जी.यादव यांची कहाणी सर्वसामान्याना विचार करण्यास भाग पाडते.

उत्तुंग भरारी समाजकारणाची… त्यांचा ठसा राजकारणातही

श्री.भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद भूषविणाऱ्या खानापूरचे आर.जी.यादव

सर्व समाज शिक्षित असला पाहिजे, तसेच वंचित समाज्याने  स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठी खानापूर (ता. हवेली) येथील आर.जी. यादव यांचे नेहमी प्रयत्न सुरू असतात. त्यांनी काळभैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना, पुरूषाना पाठबळ देत स्वतःच्या पायावर उभे केले आहे. आर.जी.यादव यांना शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले.  घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. समाजसेवाचा वारसा हा त्यांच्या जीवनाचा आधार आहे, असे ते सांगतात.

आर.जी.यादव यांनी समाजकार्याची गोडी शालेय जिवणापासुन लागली स्वतःच्या गावातील नागरिकांना  भेडसावणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला. ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणी खूप आहेत. संसाराचा गाडा ओढताना बहुतेक महिलांना आर्थिक अडचणी खूप येत होत्या. त्यामुळे पहिल्यांदा या महिलांचा आर्थिक प्रश्‍न सोडविला पाहिजे याची जाणीव झाली. पतसंस्थेच्या माध्यमातून आपण महिलांच्या व नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडवू शकतो. असा विचार केला. त्यानुसार पतसंस्थेची  संकल्पना अंमलात आणायला सुरुवात केली. पहिल्यांदा पतसंस्था उभी करण्यासाठी खुप कष्ट घेतले. महिलांचे,गोरगरीब जणतेचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले. पतसंस्थेची जोरावर गोरगरीब जनतेला कर्ज प्रकरण देऊन त्यांना बचतीची सवय लावली. झाल्या. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवणे हा त्याचा छंद झाला त्यामुळे माझ्या मनाला खूप समाधान मिळाते आसे ते सांगतात.


 त्याबरोबरच दिवाळी फराळ, मिठाई यांचेही वाटप सुरू केले.आनेक कार्यक्रम राबवले  त्यामुळे समाजकार्य करण्यासाठी मला आवड निर्माण झाली. बाहेरगावी जाऊन काम करण्यापेक्षा आपल्या गावातच काम करून गाव सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे मी नियोजन केले.
नातेवाईकांचे, मैत्रिणींचे वाढदिवस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला मद्दत करणे. या माध्यमातून शाळेला वेगवेगळ्या पद्धतीने वस्तूरूपी मदत करण्याचे काम सुरू केले. या माध्यमातून गरजू मुलांना खेळणी, कपडे, वह्या, पुस्तके देण्याचे काम सुरू आहे.शाळामध्ये सुविधा नसेल तर त्या उपलब्ध करून दिल्याआहे. या सर्व कामांमुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील गरिबांची मुले आनंदी वातावरणात अभ्यास करू लागली आहेत.


 सध्या विविध समाजोपयोगी उपक्रम सध्या सुरू आहेत. महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन, औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, मातृदिवस साजरा करून गरजू व वंचित महिलांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप, आषाढ महिन्यातील नैवेद्याऐवजी शिधा दान मोहीम राबवून गोळा झालेला शिधा अनाथ आश्रमात दान करणे, प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण देणे, अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.हे सर्व उपक्रम राबविताना घरच्यांची खूप मोलाची मदत होते.सर्व गावातील नागरिकांची साथ मिळते. यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन  होते. म्हणूनच एवढे समाजकार्य करणे शक्‍य झाले आहे. यापुढे ही समाजकार्य करण्यास प्राधान्य देणार असून शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरीब व गरजू महिला, मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण या कामातून जे समाधान मिळते ते लाखो रुपये खर्च करूनही मिळू शकत नाही. निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे.

उपाध्यक्ष, संचालक व कर्मचारी यांच्या कामगिरीमुळेच पतसंस्था शिखरांच्या टोकावर

रघुनाथ गेनबा यादव-संस्थापक अध्यक्ष ,राजाराम तुकाराम जवळकर उपाध्यक्ष, पांडुरंग सिताराम कारळे सचिव, मुरलीधर जयवंत जावळकर संचालक ,शांताराम बाबुराव जावळकर संचालक ,बाबासाहेब बाजीराव शिंदे संचालक ,रोहिदास भैरू जावळकर संचालक ,सचिन प्रकाश जावळकर संचालक ,साधना सुभाष यादव संचालका ,सुरेखा किशोर जावळकर संचालिका ,शरद पवार तज्ञ संचालक ,नागेश धुमाळ-व्यवस्थापक
अमोल जावळकर-उपव्यवस्थापक
विनायक कारळे-कॅशियर
महादेव कदम - शिपाई
संदिप मोरे-वसुली प्रतिनिधी

नोंदणी क्र.पी एन ए /पी एन ए - (४)/
आर एस ए / ८ (सी आर)२२०८
सन -२००१-२००२
खानापूर ता.हवेली जि.पुणे

श्री काळभौरवनाथ ग्रामीण  बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.