पुणे पानशेत रोडवरील खडकवासला धरणावर जीवनसाधना पाणीपुरवठा केंद्र जवळ धरणाचा भिंतीचा कठडा पडून गेली एक वर्ष होत आले आहे. सदर जागा धोका दायक आहे. पुणे पानशेत रोडवरील वाढती रहदारी व ट्रॅफिक या दृष्टीने खूप धोकादायक आहे. अशावेळीअनुचित एखादी अपघाती घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थिती मध्ये पुणे पानशेत रस्त्याची उंची वाढली असून त्या प्रमाणे खडकवासला धरणालगतच्या स्वरक्षक भिंतीची उंची वाढवण्याचीहि गरज पडत आहे. पाटबंधारे खात्याला वेळोवेळी पत्र व्यवहार करुन सांगितले आहे परंतु पाटबंधारे खात्याकडून अजून पर्यंत त्या स्वरंक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम अजूनही झाले नाही.
या वर्षी पावसाची सरासरी चांगली राहिली असून धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. धरण काटोकाट भरलेले आहे. सदर धोक्याचा ठिकाणी बॅरीगेट्स रेड सिंगल किंवा धोकादायक ठिकाण सूचना फलक असे काहीही लावलेले नाही. पुणे पानशेत रोडवरील वाढती रहदारी, पर्यटकामुळे होणारी वाहनांची गर्दी या दृष्टीने खूप धोकादायक आहे. रहदारीमुळे अगोदरच हा रस्ता अपुरा पडत आहे. अशावेळी एखादी एखाद्या गाडीचा नजर चुकीने तोल गेला तर ती डायरेक्ट धरणाच्या पाण्यात पडू शकते याचे गांभीर्य पाटबंधारे विभागाला राहिले नाही. अशी घोकादायक तुटलेली स्वरंक्षक भिंत तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस दीपक मते यांनी केली आहे.