मराठा समाज्याला हक्काचे आरक्षण द्या; भरत लगड


सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहेत. यात अनेक संघटना राजकीय पक्ष आणि नेते वेगवेगळ्या आंदोलनाची हाक देत आहेत मात्र मराठा आरक्षण पुरवत मिळवण्यासाठी एका नियोजनबद्ध आंदोलनाची गरज असून यासाठी सगळे मराठा समाजातील नेते, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन  आंदोलन छेडावे असे आवाहन विनायक मेटे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी आदरणीय मेटेसाहेब यानी आपल्या ५५ वर्षातील आयुष्यातील ३० वर्ष घालवली आहे आणि आज ही ते समाज्यासाठी लढत आहेत साहेबांचे स्पष्ट मत आहे श्रेय कोणीही घ्या पण माझ्या मराठा समाज्याला हक्काचे आरक्षण द्या. हीच मापक भुमिका आहे, “राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा; अन्यथा समाजाला रस्त्यावर पुन्हा उतरण्याशिवाय पर्याय नसेल; असा इशारा शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष भरत लगड यांनी इशाराही दिला. 

मागील सरकार क़ायदा करुन आरक्षण मिळणार अशा स्थितित आणले असता आता च्या सरकारचा नाकर्तेपणा मुळे स्थगीती आली आदरणीय मेटे साहेबानी या सरकारला वेळोवेळी आरक्षण बाबत बैठक घेण्यास सांगत होते परंतु या सरकारला जाग आली नाही त्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन घेतली परंतु या सरकार चे उपसमिती अध्यक्ष झोपेचे सोंग घेत होते आणि आता आरक्षण निकाल विरोधात गेल्यावर मात्र रोज बैठक घेऊन आश्वासन देत आहेत म्हणजे या अगोदर हेच आघाड़ी सरकार राज्यात आणि केंद्रात १५ वर्ष सत्तेवर असताना आरक्षण देऊ शकले नाही यावना त्यांच्या मनातच मराठा समाज्याला आरक्षण देयाचे नाही असच  दिसत आहे असा मराठा समाज्याचा समज नक्की झाला आहे. 

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलनं पुकारली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले होते की, मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, जेष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.