जिल्हा भाजप कडून राज्य सरकारने कृषी विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाची होळी

जिल्हा भाजप कडून राज्य सरकारने कृषी विधेयकाला दिलेल्या स्थगिती आदेशाची होळी

कृषी विधेयक विधेयक ताबडतोब महाराष्ट्रात लागू करावे; जिल्हाधिकारी देशमुख यांना दिले निवेदन

पुणे: नुकतच केंद्र सरकारने देशामध्ये कृषी विधेयक पारित केलं मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे सांगत राज्यमध्ये या विधेयकाला स्थगिती दिली. त्यामुळे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपच्या वतीने जोरदार आंदोलन करत राज्य सरकारच्या या स्थगितीचा जोरदार निषेध करण्यात आला.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राज्य सरकारने कृषी विधेयकाला दिलेल्या स्थगितीच्या अद्यादेशाची होळी करत आपला निषेद नोंदवला. यावेळी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे देखील उपस्थित होते.येत्या पंधरा दिवसात कृषी विधेयकावर आणलेली स्थगिती राज्य सरकारने उठवली नाही तर तालुक्या तालुक्यात चक्का जाम करून जोरदार निदर्शनांसह तीव्र आंदोलन करू मग त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी माजी राज्य मंत्री बाळा भेगडे यांनी दिला.

मोदी सरकारने संसदेत कृषी विधेयक पास केले. शेतकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट आणणारे हे विधेयक महाराष्ट्र शासनाने लागू करण्यास नकार देत याला स्थगिती दिली. या स्थगिती आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी भाजपने जिल्ह्याच्या वतीने होळी करण्यात आली. हे विधेयक ताबडतोब महाराष्ट्रात लागू करावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी देशमुख यांना देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, सरचिटणीस धर्मेंद्र खंडारे, सुदर्शन चौधरी, उपाध्यक्ष दादासाहेब, राहुल दादा शेवाळे, नानासाहेब सातव, प्रविण काळभोर,रोहिदास उंदरे, स्नेहल दगडे, पूनम चौधरी,जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पोकळे, आळंदीच्या नगराध्यक्ष वैजयंताताई उमरगेकर, सागर भूमकर तसेच विविध आघाड्यांचे संयोजक उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.