"व्हॅक्सिन ऑन व्हील" उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव बुद्रुक हायवे परिसरात संपन्न

 


सिंहगड रोड: पुणे शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्ती, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत जे लसीकरण केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यातच लसीकरण केंद्रांवरील गर्दीही वाढत चालल्याने मुळातच ‘इम्युनिटी’ कमी असलेल्या या नागरिकांना अधिक धोका होऊ शकतो. या घटकांसाठी ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’  लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

पुणे महानगरपालिका, निरामय संस्था आणि नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या  संयुक्त विद्यमाने वडगाव बुद्रुक हायवे सहयोग नगर परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका या ठिकाणी व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रमांर्तगत परिसरातील वयोवृद्ध, दिव्यांग आणि व्याधिग्रस्त नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली . जवळ जवळ ५० लाभार्थ्यांना या उपक्रमामार्फत कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. 

व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रमाप्रसंगी वयोवृद्ध आजोबांना लस देतांना प्रसंगी नगरसेवक हरिदास चरवड आणि उपस्थित मान्यवर
व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रमाप्रसंगी वयोवृद्ध आजोबांना लस देतांना प्रसंगी नगरसेवक हरिदास चरवड आणि उपस्थित मान्यवर

हे पण वाचा, प्रयेजा सिटी ते पुणे - बंगलोर हायवेला जोडला जाणारा नवीन पुल वाहतुकीस खुला

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ बापूसाहेब पठारे, अँड. रामचंद्र कर्डीले साहेब , सचिनभाऊ कडू , पंकज फुले , डॉ.विवेक काळे , केदार नाना जाधव , पालिका अभियंता भास्कर हंडे साहेब इत्यादी मान्यवरांबरोबर निरामय संस्थेच्या डॉ.जयश्री शेटे, परिचारिका सुप्रिया घाटविलकर, सुप्रिया मांडेकर , सहाय्यक विशाल सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.