जुलै महिन्यापासून राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर; भाजप-मनसे युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

जुलै महिन्यापासून राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर


पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेही जोरदार तयारी करीत आहे. याच उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. आज पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखाध्यक्षांना नेमणूक पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठीच राज ठाकरे शुक्रवारी 8 ऑक्टोबर व शनिवार 9 ऑक्टोबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेही जोरदार तयारी करीत आहे. याच उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. पुण्यात नेमकं कोणतं राजकीय चित्र दिसून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


आज सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक होणार आहे. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित असणार आहेत. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक होईल. शनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर सकाळी 10 वाजता 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडेल. त्यानंतर सकाळी 11 वाजता 18 आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक होईल.


आगामी पुणे महापालिका निवडणुकीत यावेळेस मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यात ९० जागांवर मनसेने आपले लक्ष केंद्रीत केल्याचे सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत. दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असे मनसे नेते सांगत आहेत. मात्र, शहरात पक्ष संघटनेचा प्रभाव देखील कमी झाला होता.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.