दिवाळी फराळाचे औचित्य साधत निम्हण पितापुत्रांनी जपले राजकीय चौकटीपलीकडे मित्रत्वाचे नाते

 


पाषाण: माजी आमदार विनायक निम्हण व मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या निवासस्थानी दिवाळी स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम पाषाण येथील त्यांच्या राहत्या झुंज बंगल्यात उत्साहात पार पडला. दिवाळी ही सगळे भेद -भाव विसरून एकत्र येण्याची वेळ असते. आणि याचेच औचित्य साधून विनायक निम्हण व सनी निम्हण यांनी आपल्या मित्र मंडळींना निमंत्रण दिले. त्यांच्या या निमंत्रणाचा मान राखत भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आरपीआयचे परशुराम वाडेकर, राहुल कोकाटे, मा.नगरसेवक प्रमोद निम्हण, मावळचे आमदार सुनिलअण्णा शेळके तसेच वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे आदी उपस्थित राहिले. तसेच आपले राजकीय वैर बाजूला सारत दिवाळीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांना आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपले राजकीय वैर बाजूला सारत दिवाळीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांना आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पुण्याची संस्कृती ही आपले हेवे- देवे सोडून सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि दिवाळी फराळाचा ही आस्वाद घेतला.


”विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात.  मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे असे माजी आमदार विनायक निम्हण यांनी सांगितले. याच बरोबर  बाळासाहेब बोडके, उदय महाले, दत्ता बहिरट, निलेश निकम, खडकी कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक कमलेश चासकर, दुर्योधन भापकर, अभय सावंत, काँग्रेस पक्षाचे रोहित टिळक, अभय छाजेड, मोहन जोशी, शिवाजी बांगर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक ज्योती कळमकर, सायली सायकर, मा. आमदार विनायक निम्हण मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण व विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.