वन विभाग आणि संस्कृती फाउंडेशन यांच्या वतीने "हरित वसुंधरा" महोत्सवाचे आयोजन

वन विभाग आणि संस्कृती फाउंडेशन यांच्या वतीने "हरित वसुंधरा" महोत्सवाचे आयोजन


पुणे: मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत, त्यामुळे मानवाला विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण करणे तसेच पर्यावरणाचे महत्व नागरिकांना समजावे या दृष्टीने वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि संस्कृती फाउंडेशन यांच्या वतीने हरित वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी दिली.


हरित वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात पर्यावरण संरक्षण कल्पना, संवर्धनात मानवाचा हात, निसर्गाचा समतोल, परिकल्पना, पर्यावरणात मानवी हस्तक्षेप, मानवी जीवनात पर्यावरण, पर्यावरणप्रेमी (प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ), पर्यावरण संरचना आणि मानव, पर्यावरणाबद्दल दृष्टिकोन / दूरदृष्टी, निसर्ग आणि मानव सहसंबंध, कधी थांबणार ऱ्हास जंगलांचा, पर्यावरणाच्या समतोलासाठी पुढाकार, पर्यावरण संस्थांचा आढावा, पर्यावरणाबद्दल सामाजिक प्रबोधन, पर्यावरणविषयक मुलाखत, टेकड्यांचे संरक्षण आदी विषयासंदर्भात प्रवेशिका मागविण्यात आले आहेत. यासाठी लघुपट, बायोग्राफी, डॉक्युमेंट्री, ॲनिमेशन आदी माध्यमातून या स्पर्धेत स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. 


या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना संस्कृती फाउंडेशनच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रवेशिकांच्या परिक्षणासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. ते या स्पर्धकांचे परिक्षण करणार आहेत. 


या महोत्सवात प्रथम २० स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून त्यातील प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमाने रोख रक्कम रू.३०,०००/-, रू.२०,०००/- आणि रू.१०,०००/-सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रवेशिका पाठविण्यासाठी २६ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली असून स्पर्धकांना www.sanskrutifoundation.in या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे, तसेच

अधिक माहितीसाठी +919922974144 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्कृती फाउंडेशनचे सचिव महेश घोलप यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.