गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे

 

sharad-pawar-gahdhi-amol-kolhe-nathuram-godase

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केलं आहे. कलाकार म्हणून त्याच्याकडे बघितले पाहिजे, पुढे बोलताना, भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलाकाराचा सन्मान करतो, असंही पवार म्हणाले.


पवार यांनी आज म्हटलं की, गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.


दरम्यान आज यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले.


रामराज्य सिनेमात रावणाची भूमिका केलेल्या कलावंताने सीतेचं हरण केलं होत, याचा अर्थ तो कलाकार रावण होता असं नाही. अमोल कोल्हेंनी केलेली भूमिका ही कलाकार म्हणून केली. ज्यावेळी भूमिका साकारली त्यावेळी ते आमच्या संपर्कात देखील नव्हते. त्यांनी भूमिका केली याचा अर्थ गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणार आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. एक कलाकार म्हणून अमोल कोल्हेंना समर्थन आहे, असंही पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.