पानशेत येथील रचना वस्तीगृहामधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन व पोषण आहाराचे वाटप

Distribution-of-sanitary-napkins-and-nutritious-food-to-the-girls-of-Rachna-Hostel-at-Panshet

पानशेत: येथील रचना सामाजिक पुनर्बांधणी संस्था या मुलींच्या वसतिगृहात सॅनिटरी पॅड व पोषण आहाराचे लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने वाटप करण्यात आले. 

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबचे  संस्थापक स्वर्गीय मेलवीन जोन्स यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी क्लबचे अध्यक्ष ला.महेश गायकवाड, क्लबच्या फर्स्ट लेडी ला.सुशीला गायकवाड, नवीन मेंबर ला.गजानन बिरामने व त्यांचा छोटा मुलगा शंभूराज आणि तन्मय महेश गायकवाड उपस्थित होते.


 या वसतिगृहामध्ये पानशेत पासून 40-50 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरकोली, माणगाव, घोडखल, वेगरे, बेबंटमाळ, मालवली, निळकंटेश्वर, लवासा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अतिदुर्गम व डोंगरी भागातील गरीब व आदिवासी धनगर समाजाच्या मुली वास्तव्यास असून वेगवेगळ्या शाळा व कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत. 


यावेळी या मुलींना आहार व आरोग्य या विषयावर अध्यक्ष महेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.वसतिगृहाच्या प्रमुख सौ.राजश्री जाधव मॅडम यावेळी उपस्थित होत्या, त्यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.