पुण्यात बिझनेस प्रोमोट करण्याची संधी: महिला दिनाचे औचित्य साधत पुवो शॉपिंग फेस्टचे आयोजन

Opportunity-to-promote-business-in-Pune-Puwo-Shopping-Fest-organized-on-the-occasion-of-Women-s-Day

पुणे: फेसबुकच्या माध्यमातूनही व्यवसायाची वृद्धी घडवून आणली जाऊ शकते हे पूवो फेसबुक ग्रुपने दाखवून दिले आहे. गेल्या वर्षी महिला दिनाचे औचित्य साधत पुवो फेसबुक मार्फत पुवो शॉपिंग फेस्टचे आयोजन वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला व्यावसायिकांना एकत्र करत पुवो फेसबुकच्या ग्रुपच्या माध्यमातून या महिलांना पुवो शॉपिंग फेस्टच्या पदर्शनाद्वारे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. एका वर्षांमध्ये पुवोने तब्बल  ६ वेळेस पुवो शॉपिंग फेस्टचे आयोजन करून लॉकडाऊन मध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या व्यावसायिकांच्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावण्याचा आदर्श घालून दिला आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळातही पुणेकरांनी  या शॉपिंग फेस्टला भरभरून प्रतिसाद दिला. 



त्यानंतर मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही महिला दिनाचे औचित्य साधत पुवो शॉपिंग फेस्टचे आयोजन केले आहे. पुण्यातील  डी. पी. रोड वरील नामांकित शुभारंभ लॉन्समध्ये मार्च महिन्यात ४, ५ आणि ६ मार्च रोजी हे तीन दिवसीय एक्सहिबिशन स्टॉल धारक व्यावसायिक आणि चोखंदळ पुणेकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. महारष्ट्रासहित भारतामधून शंभराहून अधिक अधिक स्टॉल धारक व्यावसायिक या शॉपिंग फेस्ट मध्ये आपला माल विक्री आणि प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत. या माध्यमातून शॉपिंग फेस्ट मध्ये सहभागी झालेले व्यावसायिक या परिसरातील लोकांना ऑनलाईन सुविधाही देत आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी पुवो शॉपिंग फेस्टचा वर्धापन दिन आहे. 





या तीन दिवसीय प्रदर्शनातून तुम्हाला सुंदर शोभेच्या वस्तू, हातमागावरचे फॅब्रिक, महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ येथून तयार होणाऱ्या हँड ब्लॉक प्रिंटेड फाब्रिक डिझाईनर साड्या, खण साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, फोटोवरून भरतकाम करून रेखाटलेले व्यक्तिचित्र, भित्तिचित्र, लग्न सण-समारंभाला देण्यासारख्या भेटवस्तू, नाजूक कोरीवकाम केलेले फॅब्रिक आणि ट्रॅडिशनल दागिने घरगुती खाद्यपदार्थ, घर व किचन यासाठी उपयुक्त गोष्टी यांची खरेदी करता येईल, शॉपिंग फेस्ट मध्ये शंभराहून अधिक स्टॉल असणार आहेत. या स्टॉल मधून खरेदीच्या अनानंदासोबतच रुचकर अश्या खाद्यपदार्थांचंही आस्वाद घेता येणार आहे. 


"हस्त निर्मित व्यवसायाला त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन नक्कीच हातभार लावण्याचा पुवो फेसबुक ग्रुपचा नेहमीच प्रयत्न असतो" स्टॉल बुकिंग साठी संपर्क - 9356002990


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.