पुण्यात बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी, स्टाईल एलिट तर्फे "Summer Flea Market" चे आयोजन


Golden-Opportunity-To-Promote-Business-In-Pune-Style-Elite-Organizes-Summer-Flea-Market


 पुणे:
स्टाईल एलिट तर्फे एप्रिल महिन्यात बावधन येथे  "Summer Flea Market" चे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातून ८० पेक्षा जास्त व्यावसायिक या मध्ये सहभागी होणार आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या बावधन वासियांसाठी येथे खरेदीबरोबरोच खाण्यापिण्याचाही आस्वाद घेता येणार आहे. या ठिकाणी व्यासायिकांना त्यांचा बिजनेस प्रोमोट करण्याची संधी भेटणार आहे. या दोन दिवसीय  "Summer Flea Market" सुरवात १६ आणि १७ एप्रिल रोजी बावधन येथील एल एम डी. चौकातील आठवडे बाजार मैदानावर होणार असून दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत या ठिकाणी खरेदीबरोबरोच खाण्यापिण्याचाही आस्वाद घेता येणार आहे, यामध्ये सहभागी झालेले व्यावसायिक या परिसरातील लोकांना ऑनलाईन सुविधाही देऊ शकतात. गेल्या ५ वर्षांपासून स्टाईल एलिट व्यावसायिकांना अश्या शॉपिंग फेस्टिव्हल च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे आणि त्याला या परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या माध्यमातून उद्योग व्यवसाय वाढीस चालना मिळत आहे. "Summer Flea Market"ची स्टॉल बुकिंग चालू झाली असून स्टॉल बुकिंग चालू झाली आहे. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बावधन परिसरातून चालना मिळेल.  संपर्क- जिगीशा: ९८३४८८५०८९, निकिता: ९२२५५७७५८६ या नंबर वर संपर्क करावा.संपूर्ण भारतातून ८० पेक्षा जास्त व्यावसायिक या मध्ये सहभागी होणार आहेत. याठिकाणी एकाच छताखाली सर्वांना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू या ठिकाणी आपणास मिळणार आहेत. या मध्ये बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ येथून तयार होणाऱ्या हँड ब्लॉक प्रिंटेड फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, कोल्हापुरी चप्पल असे नानाविविध व्यावसायिकांचे स्टॉल असणार आहेत. याच बरोबर खवय्यांसाठी २५ हुन अधिक खाण्याचे स्टॉल असणार आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.