पुण्यात "विंटर शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन, बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी,

 

Organized-Winter-Shopping-and-Food-Festival-in-Pune

पुणे: हिवाळा म्हटला की वर्षभर जी गोष्ट कपाटाच्या ठेवली असते ती बाहेर निघते ते म्हणजे स्वेटर आणि मफलर. लोकरीचे मऊ आणि उबदार स्वेटर थंडीत खूपच कामी येते. तीनही ऋतू हे समसमान असल्यामुळे सर्वच ऋतूंचा अनुभव येथे अनुभवायला मिळतो. या ऋतूमध्ये सर्वांना आवडणारा ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळा हा थंडीचा काळ. साधारण ऑक्टोबर हिट संपल्यानंतर हळूहळू थंडीची चाहूल लागते. अशाच गुलाबी थंडीत बालेवाडी येथे विंटर शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. 


लहू बालवाडकर यांच्या सहयोगाने पुण्यात "विंटर शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिव्हल बालवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर सर्वांसाठी खुला राहणार आहे.  बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली आणि तेही दोन दिवस मिळणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील. 


या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू आपणास खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, दिवाळीच्या शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत.


आपणही या शॉपिंग अँड फूड फेस्टिवल मध्ये सहभागी होऊन आपला व्यवसाय बावधन परिसर वाढवू शकता. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बाणेर-बालेवाडी परिसरातून चालना मिळेल.


उद्योजकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी

हिंजवडी आय. टी. जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडीकारणांसाठी खास  "विंटर शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी बाणेर-बालेवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. तसेच या पुढेही ऑनलाईन सेवा देऊ शकता. 


stilt walker in pune


लहान मुलांसाठी खास आकर्षण 

या फेस्टिव्हल मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असणारे लांब पायाचे स्टिल्ट वॉकर, आणि जोकर यांची लहान मुलांच्या करमणुकीसाठी तसेच जम्पिंग आणि किड्स बॉऊन्सिंग टोटली फ्री असणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.