टाकळकरवाडीत खेड बिटाच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न


पुणे ग्रामीण: (दि. २३)  कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषद परिषदेकडून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धा टाकळकरवाडी येथे ज्ञानेश्वर गणपत टाकळकर् विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडी येथे यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या. 


स्पर्धेचे उद्घाटन कैलासराव टाकळकर ज्ञानेश्वर ग.टाकळकर विद्यालयाचे अध्यक्ष, सुरेशभाऊ टाकळकर शा .स अध्यक्ष, कारभारी टाकळकर उपसरपंच टाकळकरवाडी, सुचित्रा टाकळकर शा.व्य.स सदस्य, लक्ष्मण बोऱ्हाडे व्य.स.सदस्य जऊळके खु, दत्तात्रय गोसावी केंद्रप्रमुख टाकळकरवाडी, कल्पना टाकळकर  केंद्रप्रमुख तुकईभांबुरवाडी , बाळासाहेब गावडे केंद्रप्रमुख कनेरसर, किरण तांबे केंद्रप्रमुख गुळाणी, डी.टी मांजरे मुख्याध्यापक ज्ञा.ग.विद्यालय टाकळकरवाडी यांच्या हस्ते करण्यात आले.


वैयक्तिक स्पर्धेत लहान गट,मोठा गट मुला मुलींच्या धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक,थाळी फेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सांघिक स्पर्धेत कबड्डी, खोखो, लेझीम अशा स्पर्धा घेण्यात आल्या. तर सांस्कृतिक स्पर्धेत भजन आणि लोकनृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धांचे नियोजन चारही केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी केले होते. नियोजनबद्ध पद्धतीने या संपूर्ण स्पर्धा पार पाडल्या.


सर्व विजेत्या स्पर्धकांना जीवन कोकणे साहेब गटशिक्षणाधिकारी तसेच चारही केंद्रप्रमुख यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कोकणे साहेबांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्राफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.


स्पर्धा पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य शितोळे सर,पिंगळे सर,कडलग सर,काळे सर,मावळे सर,राळे सर,नेहरे सर,बैरागी सर,हांडे सर,आदक सर,काळुराम ठाकूर सर, यानभुरे सर,तसेच खेड बिटातील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक या सर्वांचे लाभले. ट्रॉफीचे सौजन्य श्री मसुडगे सर आणि संदिप वाळके सर यांनी दिले. पंच म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षकांनी चोख काम पार पाडले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.