‘इंद्रायणी थडी’ ऑनलाईन स्टॉल बुकिंग चालू! फ्री स्टॉल बुक करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Indrayani Thadi 2023 Dates


 इंद्रायणी थडी मध्ये स्टॉल बुक करण्यासाठी ऑनलाईन लिंक या ठिकाणी क्लिक करून स्टॉल बुक करा 

इंद्रायणी थडी - स्टॉल बुकिंग 

http://indrayanithadi.maheshlandge.in/stall


संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या इंद्रायणी थडी जत्रेला यावर्षी तुफान प्रतिसाद मिळत आहे. संयोजकांनी सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणीला अवघ्या तीन दिवसांत १५०० हून अधिक इच्छुकांनी ‘स्टॉल बुकिंग’ केले आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा जत्रा नवा विक्रम प्रस्थापित करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 



भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने प्रतिवर्षी महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता या हेतूने भोसरीमध्ये इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन केले जाते. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी महिला बचत गट आपली उत्पादने विक्रीसाठी स्टॉल लावतात. 


 इंद्रायणी थडी मध्ये स्टॉल बुक करण्यासाठी ऑनलाईन लिंक या ठिकाणी क्लिक करून स्टॉल बुक करा 

इंद्रायणी थडी - स्टॉल बुकिंग 

http://indrayanithadi.maheshlandge.in/stall




यावर्षी एकूण ८०० स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला बचत गटांची विविध खाद्य उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, जीवनावश्यक वस्तू असे विविध स्टॉल नागरिकांसाठी पर्वणी राहणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जत्रेचे नियोजन असून, मनोरंजन, ऑटोमोबाईल, पर्यावरणपुरक उत्पादने, रोजगार मेळावा, विविध स्पर्धा, ग्राम संस्कृती, लहान मुलांसाठी खेळणी अशा सुमारे १५० निरनिराळे उपक्रम नागरिकांना मोफत पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळतील. यासाठीही ऑनलाईन नोंदणी करता येते.





 इंद्रायणी थडी मध्ये स्टॉल बुक करण्यासाठी ऑनलाईन लिंक या ठिकाणी क्लिक करून स्टॉल बुक करा 

इंद्रायणी थडी - स्टॉल बुकिंग 

http://indrayanithadi.maheshlandge.in/stall


ऑनलाईन बुकिंग अर्जांची होणार छाननी…

इंद्रायणी थडी  जत्रेकरिता ऑनलाईन स्टॉल बुकिंग सुविधा आहे. त्यामुळे इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.  संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० हजार अर्ज नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यामाध्यमातून केवळ ८०० स्टॉल निश्चित करण्यात येतील. त्यासंदर्भात अर्जांची छाननी करण्यात येईल. प्रामुख्याने खाद्य पदार्थांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार आहेत. उत्पादनांसाठी विविध स्टॉल प्रकारण उपलब्ध करुन दिले आहेत. सर्व नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असून, ‘लकी ड्रॉ’ द्वारे स्टॉल वाटप केले जाणार आहे.  ऑनलाईन बुकिंग सुविधा दि.५ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असेही आवाहन संजय पटनी यांनी केले आहे. 


 बाणेर-बालेवाडी परिसरात "संक्राती शॉपिंग फेस्टिवल"च्या माध्यमातून बिजनेस प्रमोट करण्याची सुवर्णसंधी  


 इंद्रायणी थडी मध्ये स्टॉल बुक करण्यासाठी ऑनलाईन लिंक या ठिकाणी क्लिक करून स्टॉल बुक करा 

इंद्रायणी थडी - स्टॉल बुकिंग 

http://indrayanithadi.maheshlandge.in/stall



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.