भारत आणि श्रीलंका अंतिम आशिया चषक कपावर पावसाचे सावट...

 

Sri-Lanka-Vs-Bharat-Asia-Cup-

 श्रीलंका : आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्ट पासून सुरु झालेल्या आशिया चषक कपाचा अंतिम विजेता रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३ ला घोषित होणार आहे. या आधीही भारत आणि श्रीलंका अनेक वेळा  अंतिम लढतीसाठी आमने सामने आलेले आहेत. 

सुपर ४ मध्ये श्रीलंकेचा पराभव करत भारत अंतिम फेरीत पोहचला असून पाकिस्तानला पराभव करत  श्रीलंकाने  अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. परंतु, सकाळ पासूनच या ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने आशिया चषक कप अंतिम सामना होईल कि नाही असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. राखीव दिवशीही पाऊस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

जर १७ तारखेचा अंतिम सामना रद्द झाला तर सोमवार दि. १८ सप्टेंबर २०२३ हा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे. यादिवशीही पाऊस थांबला नाही तर भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.