एकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचं तरी; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा

Baramati Loksabha Election Ajit Pawar at baramati


 बारामती: एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांमध्ये कधी शरद पवारांसोबत  तर, कधी अजित पवारांसोबत दिसतात, असं सांगत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मी असा दावा करणार नाही की शंभर टक्के काम झालं. पण आमच्या हातात ज्यावेळेस सूत्र आली, तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. 


काहीजण दादा आले की, दादांच्या पुढे पण हलगी वाजत असतात. फटाके वाजत असतात आणि दादाला दिसेल, असं पुढे चालत असतात आणि दादांची पाठ फिरली आणि दुसरे आले की, त्यांच्याबरोबर असतात, अरे काय चाललंय तुमचं. एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, हे काय लावलाय चाटाळपणा, नेमकं काय करायचं ते ठरवा, असं म्हणत अजित पवारांनी दोन्ही पवारांच्या मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


माणूस चुकतो जो काम करतो तो चुकतो. मी बोलतो म्हणून शब्द गेला परंतु कायम गेला नाही  त्याकरता माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणे, आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघेही नाही आणि त्याच्यामुळे आता चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या बारामतीत आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं, हे तुम्ही ठरवा, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, लक्ष्मी म्हणून समजतात, कुणाच्याही घरामध्ये सून आली तर सासू  काही दिवसांनी तिच्या हातामध्ये चावा देतात ना आणि सगळे आता तू बघ आणि चुकले तर ती सुनेला सांगते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.