"इकडून नाही, तिकडून जा" मोदींच्या सभेमुळे पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल

Race-Course-Narendra-Modi-Sabha-Pune-Traffic-Route

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवारी सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर होणार आहे. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन दुपारनंतर लष्कर, तसेच परिसरातील काही रस्ते बंद वाहतुकीत बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

रेसकोर्स परिसरामधील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतुक करण्यात येणार आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रोड चौक. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद करण्यात येत आहे. बिशप स्कूल चौक ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील. या मार्गावरील वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बेऊर रस्ता चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.


पुणेकरांना पर्यायी मार्ग दिले आहेत त्याचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रस्ता जंक्शन येथून इच्छित स्थळी जाऊ शकता.

खालील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.

गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रस्ता)

गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी.

भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रस्ता)


पुणे- सोलापूर सासवड रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी भैरोबानाला ते वानवडी बाजार पोलिस चौकीचौक दरम्यान आणि वानवडी बाजार ते मम्मादेवी जंक्शन पार्किंगची सुविधा असेल.

पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढा, वॉर मेमोरिअल ते घोरपडी रेल्वे गेट आणि आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी गाव.

पुणे- सातारा, सिंहगड रस्ता आणि स्वारगेट परिसरामधील वाहनांसाठी बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोड अंतर्गत रस्ते, तीनतोफा चौक आणि बिशप स्कूल परिसर.

सर्व बसेससाठी रामटेकडी उड्डाण पुलावरून पुढे हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये पार्किंगची सुविधा.

सर्व व्ही.व्ही.आय.पी. वाहनांसाठी भैरोबानाला चौक ते आर्मी पब्लिक स्कूल दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे पार्किंग सुविधा करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.