पुणे पोर्श गाडी अपघात प्रकरण: रवींद्र धंगेकर अन् मुरलीधर मोहोळ यांच्यात जुंपली

pune-porsche-car-accident-Ravindra-Dhangekar-vs-Murlidhar-Mohol


पुणे: दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांचा जीव घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना ज्युएनाईल अॅक्टनुसार न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. “काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती”, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केलाय. आता मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. 


रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का?”, असे प्रश्न रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत. “आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे. अधिकारी, मंत्री तर निघून जातील. पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यंपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल”, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.



धंगेकरांच्या टीकेला मुरलीधर मोहोळांचं उत्तर

धंगेकरांच्या या टीकेनंतर पुण्याचे माजी महापौर आणि पुणे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोहोळ यांनी एक्स (ट्विटर वर)  पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते धंगेकरांना उद्देशून म्हणाले की, “लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच!”

मोहोळ म्हणाले, “कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग ते प्रकरण न्यायालयात जातं. मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे.” यासह मोहोळ यांनी एफआयआरची १९ मे रोजीची प्रत शेअरकेली आहे. मोहोळ म्हणाले, ही १९ तारखेची प्रत पाहा आणि ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.”


धंगेकरांचे पुन्हा ट्विटरवरून प्रत्युत्तर   

रवींद्र धंगेकर व मुरलीधर मोहोळ या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर समाजमाध्यमातून शाब्दिक आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. आता धंगेकरांनी ट्विट करत पुन्हा मोहोळ यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये  304 लावण्यात आलेला नाही.का नाही लावला...? सोबत पहिली F.I.R कॉपी जोडतोय.नीट वाचून घ्या. इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....? पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात ? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत.पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.