“कसबा काँगेसचे आमदार लाडकी बहिण योजनेवर टीका करणार अन् तेच लाभ घेणार,” श्रीनाथ भिमालेंचा प्रहार

 

Ravindra Dhangekar Ladaki Bahin Yojana Shreenath Bhimale

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून महानगर पालिकेचे माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मतदारसंघात ३० ठिकाणी  मतदार नोंदणी अभियान आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण अभियानाची सुरू केली आहे. आज सकाळी गजानन महाराज मंदिर लक्ष्मीनगर येथे अभियानाला सुरूवात झाली असून ती पुढील आठ दिवस नागरिकांसाठी राहणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्रीनाथ भिमाले यांनी आज नागरिकांना केले.


निवडणुक आयोगाने मतदारसंघातील ७० ते ८० हजार नावं मतदार यादीतून वगळली गेली होती. यामध्ये २७ ते २८ हजार नाव बदलण्यात गेली होती. यातच आता निवड”तेच टिका करणार अन् तेच लाभ घेणार,” श्रीनाथ भिमालेंचा कॉंग्रेसच्या आमदारावर प्रहारणुक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. एका राजकीय पक्षाचा भाग म्हणून आम्ही देखील आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात ३० बुथ लावले आहेत. यामध्ये नवीन मतदार नोंदणी तसेच इतर काही सरकारी योजनांची माहिती तसेच अर्ज  याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे.


मतदार यादीत निवडणुक आयोगाकडून झालेल्या चुका दुरूस्त करून देण्यासाठी हा अभियान राबविला जात आहे. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार नाव नोंदणी अभियान सुरू केलं आहे. स्थलांतरीत तसेच १८ वर्षावरील नवीन मतदारांसाठी देखील हे अभियान आहे. यातच राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. त्या योजनेचा फायदा मतदारसंघातील सर्वच महिलांना झाला पाहिजे. यासाठी आम्ही मतदारसंघातील ३० बुथ केंद्र सुरू केले आहेत. या बुथकेंद्रावर योजनेसंदर्भात अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घ्यावा. असे आवाहन देखील श्रीनाथ भिमाले यांनी केलं आहे.

दरम्यान,  कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर टिका केली. परंतु त्यांनीच या योजनेसंदर्भात पोस्टर लावले आहेत. यातच कसब्याच्या कॉंग्रेसच्या आमदाराने वरती मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अन् खाली त्यांचा फोटो लावला आहे. या पोस्टरवरून मुख्यमंत्री गायब आहेत. योजनेचा विरोध करणार अन् त्याच योजनेचा लाभ घेणार. कॉंग्रेसची ही सर्व लोक ढोंगी आहेत. आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचा संकल्प घेतला आहे. महिलांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा. अन् विरोधकांच्या कुठल्याही थापांना बळी पडू नका. असा टोला देखील भीमाले यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.