धायरी: पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या अधिपत्याखाली आंबेगाव पोलीस स्टेशन, नांदेड सिटी पोलीस स्टेशन, बाणेर पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशन, वाघोली पोलीस स्टेशन, फुरसुंगी पोलीस स्टेशन, काळेपडाळ पोलीस स्टेशन या वीन पोलीस स्टेशनला राज्यशासनाने मान्यता दिली आहे आली आहे. नांदेड सिटी येथील प्रशस्त जागेत हे नवीन पोलीस ठाणे होणार असले तरी या नवीन पोलीस ठाण्याचे नाव काय असेल हे मात्र गुलदस्त्यात होते. आता मात्र अधिसूचनेमध्ये नांदेड सिटी पोलीस स्टेशन असे अधिकृत नाव मिळाले आहे.
खडकवासला धरण पर्यटन क्षेत्र असल्याने परिसरात पर्यटकांची संख्या अधिक असते. बऱ्याचदा गुन्हेगार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार होतात. यावेळी तपास कामात शहर पोलिसांना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर हवेली पोलीस ठाण्यातील ही चार गावे पुणे शहर पोलीस दलाला जोडून विकासाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.
नांदेड सिटी पोलीस स्टेशनची हद्द
पूर्वेस - धायरी फाटा पासून दक्षिणेस नऱ्हे रोडच्या पूर्व बाजूने शिवपार्वती मंगल कार्यालय, श्री होंडा, अंबामाता मंदिर नंदनवन सोसायटी पर्यंत, पुढे जांभूळवाडी गावाची शिव.
पश्चिमेस - दळवीवाडी दक्षिणेस जाधवनगर, स. न. १२२, १२४, १२६, १२७, व १२८, डीएसके विश्व मधील सहा इमारती, खंडोबा माळ टेकडीच्या पूर्व भागाचा उत्तर ते खंडोबा माळ मंदिरापर्यंत,
दक्षिणेस - जांभूळवाडी गाव ते पश्चिमेस खंडोबा माळ
उत्तरेस - दळवी फाटा ते सिंहगड - पुणे रोड ने नांदेड सिटीच्या मुख्य गेट पर्यंत