लेट्सअप मराठीचे पत्रकार विष्णू सानप डिजिटल स्टार पुरस्काराने सन्मानित

 

Let-sUp-Marathi-journalist-Vishnu-Sanap-honored-with-Digital-Star-Award-Digital-Media-Sampadak-Patrakar-Sanghatna

पुणे: ग्रामीण समाजाचे प्रश्न, सामाजिक वास्तव आणि जनतेचे मुद्दे प्रभावीपणे मांडणाऱ्या लेट्सअप मराठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील पत्रकार विष्णू सानप यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने दिला जाणारा ‘डिजिटल स्टार पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २५ मे २०२५ रोजी पुण्यातील JW Marriott हॉटेलमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठीत सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


"हा पुरस्कार माझ्या पत्रकारितेतील प्रवासाला दिलेली सार्वजनिक मान्यता आहे. "हा सन्मान माझ्या जबाबदाऱ्या वाढवणारा आहे. खरे प्रश्न मांडणारी आणि लोकांपर्यंत पोहोचणारी पत्रकारिता करणे हेच माझे उद्दिष्ट राहील." विष्णू सानप 


विष्णू सानप यांनी डिजिटल पत्रकारितेत ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देत अंधारात असलेले मुद्दे समोर आणले. पाणी, शिक्षण, बेरोजगारी, आणि स्थानिक प्रशासनातील अपयश यावर त्यांनी सातत्यानेअभ्यासपूर्ण केलेली परखड आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता हीच त्यांच्या सन्मानामागील खरी कारणमीमांसा ठरली. 


"डिजिटल स्टार पुरस्कार" हा राज्यातील डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या गुणवत्ताधिष्ठित पत्रकारांना दिला जाणारा मानाचा पुरस्कार आहे. माध्यमांच्या नव्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे योगदान अधोरेखित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. विष्णू सानप यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे ग्रामीण प्रश्नांना डिजिटल माध्यमातून देण्यात आलेले व्यासपीठ आणि पत्रकारितेच्या सामाजिक भानाची दिलेली मान्यता आहे. हा पुरस्कार त्यांच्यासह इतर तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, हे निश्चित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.