मा सरपंच संतोष सुरगुडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून २१ हजाराचा धनादेश दिला शाळेसाठी

मा सरपंच संतोष सुरगुडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून २१ हजाराचा धनादेश दिला शाळेसाठी
विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स: आंबी ता. हवेली येथे चक्रीवादळामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे पावसामध्ये मुलांना शाळेत बसता येत नाही अशी माहीती. सरपंच माणसी विष्णू निवंगुणे आणि ग्रामसेवक राजू सोनवणे यांच्या कडून मिळाली असता मा.सरपंच, संतोष सुरगुडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसासाठी खर्च न करता प्राथमिक शाळेच्या इमारत दुरुस्ती साठी २१ हजार रुपयांचा धनादेश दिला.

 मा.सरपंच, संतोष सुरगुडे आंबी ता हवेली जि. पुणे..यांचा कालचा वाढदिवसाचा खर्च त्यांनी शाळेसाठी २१०००/रूपये धनादेश स्वरूपात संरपच ग्रामसेवक यांच्या हतात सुपूर्द केला .त्यावेळी आंबी गावचे सामाजिक कार्यकर्ते सरपंच ग्रामस्थ संतोषां वरपे हवेली तालुका अध्यक्ष काँग्रेस व विठ्ठल साळेकर मनसे सैनिक उपस्थित होते. गावातील सर्व स्थरावरून संतोष सुरगुडे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.