BJP विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण होऊन निवडणुकीपूर्वी असलेली भाजप-शिवसेना युती तुटली आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिसेनेने सत्तेत येत भाजपला सत्तामोहिनिपासून दूर ठेवले. याचीच खात भाजपच्या शिरस्त नेतृत्वाला राहून राहून बोचत असते हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात आमच्यासोबत धोका झाल्याच बोलून दाखवलं आहे.
उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबतच निवडणुकी लढवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा पराभव झाला असून आम्हीच जिंकलेलो आहोत. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झालाय, असे उत्तर नड्डा म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनलेले चीनमधील वुहान शहर आता जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या शेवटच्या तीन रुग्णांनीही कोरोनावर मात केली असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या आकड्यांवर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमध्ये कम्युनिष्टांचं सरकार असल्याने तेथील आकड्यांची गॅरंटी नसल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे. त्यासोबत, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरही जेपी नड्डा यांनी भाष्य केलंय. तसेच, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आमच्यासोबत धोका झाल्याचं नड्डा यांनी म्हटलंय.