राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २१ वा वर्धापन दिन साजरा.

NCP

विशाल भालेराव
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन पुणे जिल्हा ग्रामीण पदाआधिका-यांनी  शहरातील पक्षाच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या वतीने ध्वजारोहन करण्यात आले.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सचिन चुटकुले जिल्हाध्यक्ष विद्यार्थी,चंद्रकांत मांगडे-अध्यक्ष पुर्व हवेली,अरफ भाई अल्पसंख्याक अध्यक्ष खडकवासला मंदारसंघ खडकवासला मतदार संघाचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी,, युवक अध्यक्ष सुधाकर गायकवाड़, सर्वसेलचे पदाआधिकारी उपस्थित होते .

यंदाच्या वर्धापन दिनाला कोरोना महामारी आणि निसर्ग चक्रीवादळाची पार्श्वभूमी असल्याने महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनी लोकसेवेसाठी समर्पित होण्याचा निर्धार करावा आणि रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करावे, असे आवाहन करण्यात आले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.