धायरी येथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिन निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

NCP Blood Donation
आज बुधवार, दिनांक १० जुन २०२० रोजी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी २१व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने राज्यामधे निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे धायरी येथील ब्रम्हगिरी आर्केड, लोकमान्य बँकेसमोर  रक्तदान शिबिराचे आयोजन केले.कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४६ रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला त्यासर्वांचे व आनंदऋषिजी ब्लड बँकेचे आभार मानण्यात आले.



यावेळी डॉ. नरेंद्र काळे, रुपालिताई चाकणकर,श्री काकासाहेब चव्हाण,श्री त्रंबकआण्णा मोकाशी, संतोष बापू  चकणकर,  सुधाकर गायकवाड, सौ सुरेखाताई दामिस्टे, दिपक मते पाटील, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. अजित पाटील डॉ. आसावरी पाटील व इतर मित्र मंडळींचे सहकार्य लाभले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.