खासदार श्रीरंग बारणे यांना लक्ष्मणभाऊ जगताप परिवाराचा विसर, ललित म्हसेकर यांची नाराजी...


पुणे: संपूर्ण देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची आज निडणुक आयोगाने  घोषणा केली आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार यावरून राज्य पातळीवर अनेक खलबते सुरू आहे. मावळ लोकसभेसाठी बारणे यांना तिसऱ्यांदा तिकीट देणार? की ही जागा भाजपा किंवा राष्ट्रवादीला सोडणार याबाबत देखील चर्चा सुरू असताना श्रीरंग बारणे यांनी 'संसदरत्न आप्पा' या पुस्तकाचे नुकतंच प्रकाशन केलं आणि 'संसदरत्न श्रीरंग आप्पा' वादाच्या भोवऱ्यात सापडले. 


गेल्या एक दोन दिवसापूर्वी श्रीरंग बारणे यांनी "संसदरत्न श्रीरंग आप्पा" या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, प्रकाशन केलेल्या पुस्तकांमध्ये विविध क्षेत्रातील विविध भागातील अनेक मंडळींचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणणे मांडले आहेत, परंतु खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांचा उल्लेख केलेला नाही यावरून असे लक्षात येते की खासदार आप्पा बारणे यांना पिंपरी चिंचवडचे विकासाचे शिल्पकार आदरणीय स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवाराचा विसर पडलेला आहे, मागील पंचवार्षिक मध्ये आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे काय योगदान आहे याची भुरळ बारणे यांना पडली आहे, स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या सांगण्यावरून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी परिचित नसलेले श्रीरंग आप्पा बारणे म्हणजेच युतीचे काम केले त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु बारणे ना स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा विसर पडला आहे, हि बाब सर्व भाऊ प्रेमी, परिसरातील कार्यकर्त्यांना व नागरीकांना जिव्हारी लागली आहे, अशातच  एक भाऊ समर्थक म्हणून मी व माझे सर्व सहकारी आम्ही भाऊंचा व जगताप परिवाराचा विसर पडलेल्या श्रीरंग आप्पा बारणे यांना मतदान करणार नाही, असे भाजपा उपाध्यक्ष सांगवी रहाटणी मंडल ललित म्हसेकर असे म्हटले आहे. दरम्यान, स्व. लक्ष्मण जगताप समर्थक, सुनील शेळके अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाळा भेगडे अर्थात भाजपा हे घटक पक्ष नाराज असतील तर बारणेंना मोठा झटका बसू शकतो. परिणाम थेट लोकसभा निवडणुकीवर होण्याची दाट चिन्हे मावळ मतदारसंघात दिसू लागली आहे. याचा प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांना चांगलाच फायदा होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.