वृक्षारोपणाच्या माध्यमातून वारी सोहळा साजरा कररण्याचे आवाहन, पुजा पारगे - सभापती, महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पुणे

वृक्षारोपणाच्या माध्यमातून वारी सोहळा साजरा कररण्याचे आवाहन, पुजा पारगे, सभापती, महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पुणे
विशाल भालेराव
पुणे, सिंहगड टाईम्स - १३ जूनला मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. परंतु करोना प्रादुर्भावामुळे वारकरी संप्रदायाच्या उपासकांनी आणि भाविकांनी वारीमध्ये सहभागी होता येणार नाही अश्या परिस्थितीत घरी राहूनच घरी वारी सोहळा अनुभवावा. विठ्ठलाच्या नामस्मरणात भक्तिभावाने आपल्या परिसरात झाड लावावे आणि अभंग बोलावे व पूजा करावी असे आवाहन पूजा पारगे, सभापतीमहिला व बालकल्याण विभाग पुणे जिल्हा परिषद यांनी केले.
"जाईल ग माये तया पंढरपूरा.. भेटेल माहेर आपुलिया..."

 महाराष्ट्राची सर्वात मोठी परंपरा असलेली आषाढी वारी... पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणीच या वारीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. करोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. शासनाने परवानगी दिलेल्यानुसार विश्वस्त, सेवेकरी आणि जे वारकरी मंदिरातच राहतात त्यांच्यामार्फत पालखी सोहळ्याचे प्रस्थान केले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.