खडकवासला चौपाटीवरील ४१ व्यवसायिकांना जीवनावश्यक किटचे वाटप

खडकवासला चौपाटीवरील ४१ व्यवसायिकांना जीवनावश्यक किटचे वाटप
विशाल भालेराव 
सिंहगड टाईम्स -खडकवासला धरणाच्या चौपाटीवर चहा भजी वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकून आपला चरितार्थ चालवणाऱ्या महिला व पुरुषांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागाकडून अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

खडकवासला धरण पर्यटकांसाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील असे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढलेले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या लोकांना आधार म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रमकुमार व अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सुजित पाटील यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह सदर किटचे वाटप केले.

यावेळी हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते, पोलीस पाटील ऋषिकेश मते, कामगार तलाठी धनश्री हिरवे, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सोनवणे, उद्योजक समीर कोल्हे व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.