महापौरांकडून प्रभाग क्र.१७ मधील नागझरी नाल्याची पहाणी

Pune Mahanagar Palika
विशाल भालेराव 
सिंहगड टाईम्स-आज प्रभाग क्र. १७ मधील मुख्य नागझरी नाल्याची  महापौर मा. श्री मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आली.  उरलेली कामे लवकरात लवकर कसे होतील याकडे लक्ष ठेवण्याचे अधिकार मा. महापौरांनी महापालिका आयुक्त श्री शेखर गायकवाड यांना दिले. तसेच उरलेली कामे व नाल्यातील अडथळे ताबडतोब काढून घेण्यास सांगितले. आजच्या पाहणीत बुरुडी पुल ते उतारा चौक पर्यंत नाले सफाई व नाल्याच्या मार्ग व्यवस्थित करण्याचे कामे व अडथळे काढून घेण्यास सांगितले. तसेच जे अतिक्रमण असेल ते देखील काढून टाकण्याचे आदेश दिले.

यावेळी महापौर मा. श्री मुरलीधर मोहोळ उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंतजी रासने, सभागृह नेते श्री धीरजजी घाटे, महापालिका आयुक्त  शेखर गायकवाड , उपआयुक्त  गोयल , बांधकाम प्रमुख प्रशांत वाघमारे , ड्रेनेज प्रमुख गेडाम , भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त बनकर , तसेच मुख्य खात्यातील व भवानी पेठ परिसरातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रभाग १७ मधील नगरसेवक  तेजेंद्र नथुराम कोंढरे, विशाल धनवडे, वनराज अंदेकर या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मागीलवर्षी सारख्या यावर्षी कुठल्याही प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी हा आजचा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी माझ्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.