सिंहगड रोड वरील ओढ्या-नाल्यांचा आणि पावसाळा पूर्व कामांचा महापौरांकडून घेण्यात आला आढावा.

Sinhagad Times Muralidhar Mohal
सिंहगड टाईम्स दि.६ आज सकाळी सिंहगड रोड परिसरातील ओढे नाले यांची महापौर मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आली. यावेळी गेले एक दीड महिना जी कामे चालू आहेत त्या कामांचा पाठपुरावा करून किती कामे झाली आहेत व उरलेली कामे लवकरात लवकर कसे होतील याकडे लक्ष ठेवण्याचे अधिकार मा. महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच उरलेली कामे व ओढे नाल्यातील अडथळे ताबडतोब काढून घेण्यास सांगितले.

सकाळी साडे नऊ ते बारा वाजेपर्यंत या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मागीलवर्षी सारख्या यावर्षी कुठल्याही प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी हा आजचा पाहणी दौरा करण्यात आला.

आजच्या पाहणीत पु.ल.देशपांडे उद्याना शेजारील खचलेल्या ओढ्याचे मुख्य सिंहगड रोड पर्यंत  व्यवस्थित काम करण्याचे आदेश दिले. तसेच विश्रांतीनगर भागातील ओढा, सिल्व्हर क्रिस्ट शाळेजवळील ओढा, वरद सोसायटी जवळील ओढ्यांची पाहणी करून त्यांची साफसफाई व अडथळे काढून घेण्यास सांगितले. आपटे कॉलनी जवळील पाटील हॉस्पिटल शेजारील ओढ्याच्या आजूबाजूला जे अतिक्रमण असेल ते देखील काढून टाकण्यास सांगितले.
Sinhagad Times, Muralidhar Mohal


त्याचप्रमाणे माणिकबाग, रामनगर या चौकात अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाणी तुंबून मुख्य रस्त्यावर व अनेक दुकानांमध्ये शिरते. त्यासाठी मुख्य रस्त्यावरील एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कामातील अडथळे देखील काढून घेण्यास सांगितले.

गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरामुळे वडगाव ब्रीज जवळच्या स्मशानभूमी जवळील ओढ्याच्या पडलेल्या भिंतीची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

यावेळी मा. महापौरांबरोबर उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने, सभागृह नेते धीरजजी घाटे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड साहेब, उपआयुक्त गोयल साहेब, बांधकाम प्रमुख प्रशांत वाघमारे साहेब, ड्रेनेज प्रमुख गेडाम साहेब, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे उप आयुक्त भोसेकर साहेब, खोत साहेब नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक राजश्री नवले तसेच मुख्य खात्यातील व सिंहगड रोड परिसरातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.