विशाल भालेराव
पुणे, दि.१३ जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मांगडेवाडी-डोणजे या मतदार संघामध्ये व वेल्हे तालुक्यामधील वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली. भागातील फळबागा, शेती, घरांचे यांचे नुकसान झाले आहे.
या वेळी गोगलवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी, वादळी वारे व पावसामुळे शेतक-यांच्या अंजिराच्या बागांचे जे नुकसान झाले आहे शेतकरी आणि शासकीय अधिकारी यांच्याशी बोलून पंचनामे करावयास सांगितले आहेत. आर्वी तानाजी नगर येथे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या स्मशानभूमी व पुलाची पाहणी करून कुपोषित बालकांचे घरी जाऊन त्यांना पोषण आहार कीट वाटप केले. खेड शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. कल्याण येथील वादळी वारे व पावसामुळे घरांचे नुकसान झाले आहे. कोंढणपूर येथील ब वर्ग बांधण्यात येत असलेल्या भक्त निवास व संरक्षण भिंत पाहणी केली आहे, तसेच सोनपुर, खामगाव, वेल्हे तालुक्यातील रुळे, कोंडगाव, निगडे आदी परिसरातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
वादळी पावसाचा फटका बसलेल्या गावांची पाहणी केल्यानंतर जि. प. अध्यक्षा पानसरे यांनी सर्व संबधित अधिका-यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. तसेच नुकसान झालेल्या सर्वांना नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले
या वेळी पुजा पारगे सभापती महिला व बालकल्याण, सभापती बाबुराव वायकर कृषी व पशुसंवर्धन, सारीका पानसरे, समाज कल्याण सभापती कृषी विकास अधिकारी देशमुख साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मबाक मुंढे साहेब, शिक्षणाधिकारी कु-हाडे साहेब, गटविकास अधिकारी शिर्के साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष मोकाशी, उपअभियंता मखरे साहेब, ज्या त्या गावचे सरपंच ग्रा. पं. सदस्य व इतर उपस्थित होते.