विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स - शिवसेना पुणे उपशहरप्रमुख किरण साळी यांचा वतीने पर्यावरण व पर्यटन मंत्री मा.आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फेस मास्क व सॅनिटायझर ससून रुग्णालयास भेट देण्यात आले. करोना महामारी विरोधात लढत असलेल्या ससून रुग्णालयातिल डॉक्टर, परिचारिका, सर्व आरोग्य कर्मचारी यांससाठी १०००० फेस मास्क व १०० लिटर सॅनिटायझर शिवसेना पुणे उपशहरप्रमुख किरण साळी यांच्या वतीने ससून रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे व डॉ.हरिष टाटिया त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवसेना उपनेत्या, विधान परिषद उपसभापती आ. डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी डॉ. तांबे यांच्याशी संवाद साधला, यावेळेस नीलमताई गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपयांन पर्यंतची पी.पी.टी कीट, फेस मास्क, सॅनिटायझर व इतर आवश्यक साहित्य देण्याचे आश्वासन दिले व करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी उत्तम काम करत आहे, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
या वेळी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मास्क व सॅनिटायझर च्या मदती साठी पत्राद्वारे आभार व्यक्त केले यावेळी संवादाचे सुनील महाजन, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आकाश शिंदे, प्रशांत कदम, सागर अलकुंटे, निखिल बलकवडे,ॲड तेजस दंडगवाळ, आकाश थाेरात, प्रतिक गवते, किरण बदामी, राेहीत कदम आदी उपस्थित होते.