राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे होणार महिला कोविड योद्धांचा "मर्दानी महाराष्ट्राची" सन्मानपञ देऊन सन्मान.

Rupali Chakankar राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे होणार महिला कोविड योद्धांचा "मर्दानी महाराष्ट्राची" सन्मानपञ देऊन सन्मान.
पुणे- कोरोनासारख्या भयंकर आणि जीवघेण्या रोगांशी लढणाऱ्या राज्यातील महिलांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १० जून रोजी होणार आहे. पक्षाच्या संबंधित जिल्हा कार्यालयात व सन्मानार्थी ज्या भागात काम करतात त्या ठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम "सोशल डिस्टन्सिंग" चे नियम पाळून संपन्न होणार आहे.

      महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून, तालुकानिहाय किमान २२ महिलांना सन्मानपञ, सन्मानचिन्ह, श्रीफळ व शाल देऊन पक्षाच्या वरिष्ठांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होईल. या सर्व महिलांना "मर्दानी महाराष्ट्राची" असा किताब देऊन यावेळी गौरवण्यात येईल.


      आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला पोलिस व त्यांचा स्टाफ, महिला डाॅक्टर व स्टाफ, प्रशासकीय अधिकारी यांनी कोरोनाच्या युद्धात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र कष्ट घेतले, याची सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या "महिला सन्मानाचा वारसा" या उपक्रमातंर्गत जोपासला जाणार आहे. आलेल्या संकटाला न घाबरता त्याच्याशी ताठ मानेने लढण्याची परंपरा व वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आजही महिल्या तितक्याच ताकदीने सामोरे जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे यानिमित्ताने शाबासकीची थाप पाठीवर टाकून लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यभर हा कार्यक्रम १० जून ते १५ जूनपर्यंत पार पडणार आहे.

       तसेच सिंहगड रोड भागात भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले आहे. राष्ट्रवादी डाॅक्टर सेल व आचार्य आनंद ॠषीजी ब्लड बँक यांचा सहभाग यामध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.