राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांमुळे हा पक्ष कधीच संपला नाही, शरद पवार

Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीच्या आधी जे मोठे नेते पक्ष सोडून गेले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याच वेळी विद्यमान मंत्र्यांचे देखील सध्याच्या विषाणूच्या संकटात जे काम करत आहेत, त्यांचं कौतुक करत पुढील वर्षभरामध्ये पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच वेगवेगळे उपक्रम कोणते राबवायचे आहेत.

दोन दशकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष अनेक चढ-उतार पाहिले. सत्ता असताना आणि सत्ता नसताना हा कार्यक्रम देखील पाहिला अनेक नेत्यांना भरभरून दिलं. पण स्वतः च्या सत्तेसाठी संस्थांसाठी पक्ष सोडून गेले तरी देखील त्याचा परिणाम पक्षावर झाला नाही. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. हेच सिद्ध झालं, असं म्हणत पवारांनी ज्यांनी पक्ष सोडून गेले. त्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांमुळे हा पक्ष कधीच संपला नाही, असं पवारांनी आवर्जून नमूद केले. या फेसबुक संवादामध्ये सध्या असलेलं राज्यावर संकट मुंबईत वाढत असलेली मृत्यूंची संख्या त्याचवेळी भविष्य काळामध्ये कराव्यात काय आहे, हे देखील पवारांनी भाषेत केला आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये पुढच्या काळामध्ये स्थलांतरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. परप्रांतीय लोक गेल्याने अनेक रोजगाराच्या संधी ग्रामीण भागासह औद्योगिक क्षेत्रांमध्ये अनेकांना आहेत. याचा नेमका फायदा घेत ग्रामीण शहरी भागांमध्ये स्वयंरोजगारासाठी लक्ष देण्यात यावा व त्यासाठी आवर्जून काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन देखील पवारांनी केले आहे.

पक्षाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. त्याच वेळी राज्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वित्त मंत्री अजित पवार, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यांचे कौतुक पवारांनी केले आहे. हे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे आहेत याचा अधिक अभिमान असल्याचे देखील पवार यांनी आवर्जून म्हटले आहे.

भविष्य काळामध्ये महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर हेदेखील आवर्जून काम करतील,असं पवारांचं मत आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापन दिवसाच्या निमित्ताने सध्याच्या संकटावर भविष्यकाळात काम करण्याचे नियोजन करत असतानाच सर्व सामाजिक स्तरांमध्ये अधिक करण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय पवारांनी व्यक्त करत पक्षाची राजकीय वाटचाल देखील सांगितली आहे.

जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.