अन्यथा शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शिक्षण संस्थाच्या विरोधात तीव्र आंदोलन - विशाल वाकडकर

Vishal Vakadkar
कोविड-19 या  कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, व्यवसाय, नोकरी बंद आहेत. परिणामी बंदमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजीविकेची साधने बंद आहेत. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड येथील खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावला जात आहे. पालकांना पगार अथवा आर्थिक येणे देणे मिळणे कठीण जात असताना त्यांना पाल्यांचे शालेय शुल्क भरणे कठीण झाले असून  शिक्षण संस्था चालक मनमानी करत शैक्षणिक शुल्क मागत आहेत. त्या विरोधात शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठी पालकांना शालेय शुल्क जमा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शाळांवर कठोर कार्यवाही करणे बाबत पुणे विभागातील वरीष्ठ अधिकारी यांचे कडे निवेदन देण्यात आले आहे.

लॉक डाऊननंतर मागील पंधरा वीस दिवसापासून बाजारपेठा व उद्योग हळूहळू सुरू झाले आहेत. नागरिकांना पगार अथवा आर्थिक येणे देणे मिळणे कठीण जात असताना त्यांना पाल्यांचे शालेय शुल्क भरणे जास्तच कठीण जाणार आहे. संपूर्ण लॉक डाऊन परिस्थिती संपल्यानंतर शालेय फी जमा करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असताना शासनाच्या आदेशाचे पालन न  करणाऱ्या शाळांवर तात्काळ कठोर व कायदेशीर कार्यवाही करावी. अन्यथा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मनमानी शिक्षण संस्था व्यवस्थापनांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारेल. विशाल वाकडकर, शहराध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहर

राज्य सरकारने दिनांक ८ मे २०२० रोजी राज्यभरातील शालेय शुल्क वाढ आणि जमा करण्याची सक्ती न करण्याचा शासन निर्णय काढला आहे. या परिपत्रकात सदरील तरतूद आहे “ सध्या राज्यात लॉकडाऊन परिस्थिती असतांना काही संस्था/शाळा, विद्यार्थ्यांना/पालकांना फी भरण्याची सक्ती करीत असल्याबाबत तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त क्र.6 च्या परिपत्रकान्वये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये". मात्र पिंपरी चिंचवड शहर व परिसारतील शाळा राज्य सरकारच्या वरील शासन निर्णयाचे  पालन न करता, पालकांना खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावला आहे. शहरातील अनेक शिक्षण संस्थाकडून एसएमएस, फोन, ई-मेल, व्हाट्सअप द्वारे फी भरण्याबाबत विचारले जात आहे.           
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.